Top News पुणे महाराष्ट्र

कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही- अजित पवार

पुणे | कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजूर करा, अशी मागणी आहे. कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते.

या स्तंभाच्या जवळच्या जागा ताब्यात घेण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. या जागा खाजगी मालकीच्या आहेत. त्या जागा मालकांना योग्य तो मोबदला दिला जाईल आणि या जागा ताब्यात घेतल्या जातील. मी पालकमंत्री आहे आणि अर्थमंत्री देखील आहे. या विकास आरखड्यासाठी आर्थिक बाजू देखील योग्य प्रकारे सांभाळली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही याची ग्वाही देतो, असं अजित पवार म्हणाले.

कोरोनाच्या संकटामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरुनच जयस्तंभाला व शूरवीरांना अभिवादन करावं. कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचना व नियमांचं पालन करावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर …- उद्धव ठाकरे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून 17 नंबरचा अर्ज भरता येणार!

औषध आणि काळजी हाच नववर्षाचा मंत्र- नरेंद्र मोदी

‘बिगर मुस्लीमांच्या नावाने रस्त्यांचं नामकरण व्हायला हवं’; भाजप खासदाराची मागणी

कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनिशी लढणार- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या