Top News देश

“महिला स्वतःच्या मर्जीने प्रेमसंबंध बनवून त्यानंतर बलात्काराचा आरोप करतात”

छत्तीसगड | छत्तीसगडच्या महिला आयोग अध्यक्षा किरणमयी नायक यांनी लव्ह जिहाद या विषयावर त्यांचं मत मांडलंय. नायक यांच्या म्हणण्यानुसार, महिला स्वतःच्या मर्जीने प्रेमसंबंध बनवून त्यानंतर बलात्काराचा आरोप करतात.

नायक म्हणाल्या, “महिलांनी प्रेमसंबंध करताना काळजी घ्यावी. प्रेमसंबंध करताना समोरचा व्यक्ती कसा आहे याची शाहनिशा करावी. चुकीच्या लोकांशी संबंध ठेवल्याचे परिणाम वाईट होतात.”

अशा घटनांमध्ये मुलींना स्वत:ला समजायला हवं की, विवाहित पुरुष प्रेमाच्या जाळ्यात अडकणं योग्य नाही. तो त्यांना आनंदी ठेवूच शकत नाही, असंही त्या म्हणाल्या.

नायक म्हणाल्या, “अशा बऱ्याच घटनांमध्येमुली आपल्या इच्छेनुसार प्रेमसंबंध बनवतात आणि त्यांनतर लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहतात. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने धोका दिल्यावर मग मुली बलात्काचा गुन्हा दाखल करतात.”

थोडक्यात बातम्या-

‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत

गिनीज बुकमध्ये नाव असलेल्या मुंबईच्या तरूण व्यावसायिकाची आत्महत्या!

“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”

शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस

“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या