बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फोनवरून टिका करणं सोपं आहे, मात्र तिकडे एनसीबीचे लोक लढा देतायेत”

मुंबई| एनसीबीचे म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे सध्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून चांगलेच चर्चेत आहेत. आता समीर वानखेडे यांच्या पत्नी म्हणजेच मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केलेली पोस्ट चर्चेत आलेली आहे. क्रांतीने या पोस्टमध्ये एनसीबीचं कौतुक तर केलं आहेच. शिवाय यामध्ये तीने एनसीबीवर टिका करणाऱ्यांनाही सुनावलं आहे.

यामध्ये ती म्हणते, “काही लोकांनी एनसीबी फक्त बॉलिवूडला टार्गेट करत असल्याचं म्हटलंय. अशा लोकांना मी सांगेन की त्यांनी जरा अभ्यास करावा. घरी आरामात बसून आपल्या महागड्या फोनवरून टिका करणं सोपं आहे. मात्र एनसीबीचे लोक तिकडे आघाडीवर राहून लढा देत आहेत. आपल्या देशासाठी लढणाऱ्या लोकांचा सन्मान करायला हवा.”

याव्यतिरीक्त ती म्हणाली, “तुम्ही करत असलेल्या पाठींब्याचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. आपण सगळ्यांनी एनसीबीच्या कामाचं आणि त्यांनी केलेल्या धोकादायक मोहीमेसाठी केेलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद. आपण देशासाठी लढणाऱ्या लोकांचा सन्मान करायला हवा, एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा आदर करूयात.”अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर केली आहे.

क्रांती रेडकर हिने अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. त्यापैकी ‘जत्रा’, ‘फक्त लढ म्हणा’ , ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’ हे काही सिनेमे आहेत. क्रांती रेडकरने 2017 साली समीर वानखेडे यांच्याशी विवाह केला होता. समीर  आणि क्रांती यांना दोन मुली आहेत. क्रांती नेहमी सोशल मीडियावर नेहमी आपली मतं मांडताना दिसते. विशेषत: तिने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या व्हिडीओजना अधिक पसंती मिळते.

 

थोडक्यात बातम्या

“आमच्यावर गंभीर हल्ले झालेत, तरीही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणारच”

नीरज चोप्राच्या भाल्याची लागली कोट्यवधींची बोली; किंमत ऐकून व्हाल थक्क

शेतकऱ्यांवर कोसळतोय दुहेरी अडचणींचा डोंगर, एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे…

…म्हणून कोरोनाची तिसरी लाट ठरु शकते भयावह, तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

नातेवाईकांना रेल्वे फलाटावर सोडायला जाताय?, तर ही बातमी एकदा वाचा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More