बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आज बाळासाहेब नाही पण तुम्ही आहात…”, क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

मुंबई | कॉर्डेलिया क्रुझवरील कारवाई आणि आर्यन खानच्या अटकेपासून सुरू झालेल्या प्रकरणाला रोज वेगळं वळण लागत आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना आता अभिनेत्री आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहुन तुम्ही योग्य तो न्याय करावा, अशी विनंती केली आहे.

कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय तर मुळीच सहन करू नये, हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मी त्यांचा आदर्श घेऊनच वाढले. तोच धडा गिरवत मी माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी असल्याचं क्रांतीने पत्रात लिहिलं आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुम्ही अन्याय होऊ देणार नाही, याची खात्री असल्याचंही क्रांतीने पत्रात लिहिलंय.

क्रांतीने पुढे लिहिलं की, आमचा काहीही संबंध नसताना आमच्या अब्रुची लख्तरं चारचौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रिच्या गरीमेचा खेळ करून विनोद करून ठेवला आहे आणि आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं. आज बाळासाहेब नाहीत पण तुम्ही आहात, त्यांची सावली आणि प्रतिमा मी तुमच्यात बघत असल्याचंही क्रांतीने पत्रात लिहिलं आहे.

मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहात मी लहानपणाची मोठी झालेली मुलगी आहे. एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहात असल्याचं क्रांतीने पत्रात लिहिलं आहे. सोशल मीडिया आणि त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे योग्य तो न्याय करतील या कारणाने क्रांती रेडकरने हे पत्र लिहिलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांना आणखी एक धक्का, कुटूंबातील ‘या’ व्यक्तीच्या घरी ईडीची छापेमारी

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना, ऐन सणासुदीत सर्वसामान्य नागरिक त्रस्त

आता बेडवर पडून निवांत झोप काढण्याचेही मिळणार लाखो रुपये

“स्वत:चे घोटाळे दाबण्यासाठीच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची…”

देशातील कोरोना रूग्णांसह मृतांच्या आकड्यातही वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More