बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या ‘त्या’ स्क्रिनशॉटनंतर क्रांती रेडकर नि:शब्द

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद रंगला आहे. हा वाद मिटण्यापेक्षा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात खुलास्यांचा सपाटा लावला आहे. तर नवाब मलिकांनी आज एक ट्विट करत समीर वानखेडेंची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकरवर निशाणा साधला. तर क्रांतीने ट्विट करत मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

क्रांती रेडकर आणि एका व्यक्तीचे चॅट नवाब मलिक यांनी ट्विट केले. ती व्यक्ती तिच्याकडे नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा फोटो असल्याचं क्रांती रेडकरला सांगत आहे. तर त्या फोटोच्या बदल्यात बक्षीस देईल, असा मेसेज क्रांती रेडकरने त्या व्यक्तीला केला आहे. तर त्या व्यक्तीने क्रांती रेडकरला नवाब मलिक आणि राज बब्बरचा फोटो पाठवला.

हा फोटो का पाठवला असा मेसेज क्रांती रेडकरने पाठवला तर राज बब्बरची बायकोही त्यांना प्रेमाने दाऊद म्हणत असल्याचा मेसेज त्या व्यक्तीने पाठवला. तर हे स्क्रिनशॉट शेअर करताना नवाब मलिकांनी ओह माय गॉड सकाळी सकाळी जोक मिळाला सर्वांनी आनंद घ्या असं कॅप्शन लिहिलं. त्यामुळे हा जोक असल्याचं स्पष्ट झालं. पण नवाब मलिकांच्या या ट्विटनंतर क्रांतीनेही एक ट्विट केलं आहे.

नवाब मलिकांच्या ट्विटला उत्तर देत क्रांती रेडकरने ती नि:शब्द झाल्याचं लिहिलं आहे. मला खुप खुप वाईट वाटलं की ते या पातळीवर आले. नि:शब्द, असं ट्विट क्रांती रेडकरने केलं आहे. नवाब मलिक विरूद्ध वानखेडे कुटुंबीयांचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. ट्विट आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नवाब मलिक वानखेडेंवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा?, केंद्रीय कृषीमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद

“जेवढा गुन्हा त्या नराधमांचा आहे, तेवढंच पाप आघाडी सरकारचं आहे”

‘त्या’ राड्यानंतर आमदार शशिकांत शिंदेंनी मागितली माफी, म्हणाले…

मुलांना नाश्त्यासाठी ब्रेड आणि जाम देताय तर सावधान! ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

येरवडा कारागृहात आमदार चक्क चावला कैद्याला, जखमी कैदी रुग्णालयात दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More