बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडेंच्या पाठीशी आहे ‘या’ व्यक्तीचा आशिर्वाद; क्रांती रेडकरने केला खुलासा

मुंबई | एनसीबीच्या पथकाने मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर कारवाई करत मोठ्या शिताफिने क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. एनसीबीने या क्रुझवरून शाहरुख खानच्या मुलासह 8 जणांना ताब्यात घेतलं. एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर समीर वानखेडेंची चांगलीच चर्चा होत आहे.

कॉर्डेलिया क्रुझवर केलेली कारवाई आणि आर्यन खानच्या अटकेनंतर समीर वानखेडे चर्चेत आले. या कारवाईनंतर लोक वानखेडेंना रिअल लाईफ सिंघम म्हणत आहेत. त्यामुळे आता वानखेडेंच्या खासगी आयुष्याबद्दल जाणुन घेण्यासाठी लोकांना उत्सुकता लागली आहे. समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने समीर वानखेडेंचं तोंडभर कौतुक केलं.

तर समीर वानखेडेंच्या यशामागे कोणाचा हात आहे याचा खुलासाही क्रांतीने यावेळी केला. क्रांती म्हणाली की, जेव्हा कधी समीर यांना अडचणीचा सामना करावा लागतो तेव्हा ते त्यांच्या वडिलांशी संपर्क साधतात. समीर सगळ्यात आधी त्यांचा सल्ला घेतात. ते समीरच्या पाठीशी प्रकाशाप्रमाणे उभे असल्याचंही क्रांती यावेळी म्हणाली. समीर यांचे वडील त्यांना नेहमीच मोलाचा सल्ला देत असल्याचंही क्रांतीने सांगितलं.

समीर वानखेडेंच्या यशामागे त्यांच्या वडीलांचा आशीर्वाद असल्याचा खुलासा क्रांती रेडकरने यावेळी बोलताना केला आहे. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण बॉलिवूडशी संंबंधित असल्याने चांगलंच गाजत आहे. समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखाली एनसीबी पथकाने केलेल्या या कारवाईचं सगळ्याच स्तरावरून कौतुक केलं जात आहे. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोलियम कंपन्यांचा सर्वसामान्यांना सलग दुसऱ्या दिवशी दिलासा!

सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईतुन मोठा दिलासा; वाचा सविस्तर वृत्त

“भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास ही गोष्ट शोभत नाही”

“विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास मिळणं हे ‘भाग्य’ आहे”

“पंतप्रधान मोदींच्या विरोधात आघाडी सरकारमधील तीनही पक्ष बदनामीचा कट रचतायेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More