बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो जेव्हा गुप्त ऑपरेशनवर असतो…’; आर्यन खानवर केलेल्या कारवाईवर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची प्रतिक्रिया!

मुंबई | कार्डेलिया क्रुझवर छापा टाकत एनसीबीच्या पथकानं शाहरूख खानच्या मुलासह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणाची सगळीकडेच चर्चा होत असताना विशेष कौतुक होत आहे ते छापा टाकलेल्या एनसीबीच्या पथकाचं. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वखालीच एनसीबीच्या या टीमने क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर धाड टाकली होती.

समीर वानखेडेंच्या या कामगीरीचं पत्नी क्रांती रेडकरकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असते. क्रांतीने नुकतंच ई-टाईम्सला मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने पती समीर वानखेडेच्या क्रुझवरील कामगिरीचं तोंडभरून कौतुक केलं.

समीर हा खूप मेहनती आहे. तो सध्या बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरणं हाताळत असल्याने तो हायलाईट होत आहे. समीर अशा क्षेत्रात आहे जिथे त्याला एक मिनिटही बसायला वेळ नसतो. तो दररोज गुप्त ऑपरेशनसाठी काम करत असतो. तो जेव्हा गुप्त ऑपरेशनवर काम करत असतो किंवा चौकशी करत असतो, मी त्याला स्पेस देते. कारण मी त्याच्या कामाचा आदर करते. मला त्याच्या कामगिरीचा खूप अभिमान वाटतो असं क्रांती म्हणाली.

दरम्यान, समीर वानखेेडेंनी आर्यन खानपूर्वी इतरही बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घरी धाडी टाकल्या आहेत. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, रामगोपाल वर्मा या बॉलिवूड दिग्गजांच्या घरीही समीर वानखेडेंनीच धाड टाकली होती. आता आर्यन खानच्या अटकेनंतर समीर वानखेडेंचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला धुळ चारत बच्चू कडूंची जिल्हा बँकेत बाजी

“जो अख्ख जहाज खरेदी करु शकतो त्याला ड्रग्ज विकायची काय गरज?”

‘ही घटना तर जालियनवाला बागची पुनरावृत्ती’; लखीमपूर घटनेवरून शरद पवारांचा हल्लाबोल

शाहरुखच्या मुलाआधी ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक

“अमरिंदर सिंग भाजपला मदत करतायेत अन्…”, काँग्रेसचा हल्लाबोल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More