बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊतांचं असं आहे की, दिन मे बोले जय श्रीराम, और रात को लेते सौ सौ ग्राम”

मुंबई | राज्यात भाजप (BJP) व सेनेची (Shivsena) युती तुटल्यापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शुक्रवारी राज्यात रंगाची धुळवड सुरू असताना राजकीय धुळवड देखील पाहायला मिळाली. भाजप नेते कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर खोचक टीका केली आहे.

कृपाशंकर सिंह यांनी कार्यकर्ते व आप्तस्वकीयांसोबत मोठ्या उत्साहात धुळवड साजरी केली. यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सिंह यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊतांकडून भाजपवर वारंवार होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना कृपाशंकर सिंह यांनी जोरदार टोलेबाजी केली.

असं म्हणतात वृंदावन मे आना है तो राधे राधे कहना है.. पण संजय राऊतांचं असं आहे की दिन मे बोले जय श्रीराम, और रात को लेते सौ सौ ग्राम.. जोगिरा सारारारा, अशा खोचक शब्दात सिंह यांनी राऊंतावर निशाणा साधला. तर राऊत आमचे चांगले मित्र असून लवकरच त्यांची भेट घेऊन काही विषयांवर चर्चा करणार असल्याचं देखील सिंह म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत चांगले मित्र आहेत, आमची मैत्री आहे. मात्र, होळीच्या निमित्ताने सांगू इच्छितो की ते वारंवार म्हणत असताता शिवसेनेचे लोक आयोध्येला कारसेवेसाठी गेले, मंदिर बनवण्यासाठी गेले, आम्ही हिंदुत्वाचं पालन करू. आम्ही हिंदु आहोत वगैरे. ते वारंवार हे बोलत आहेत पण त्यांना दोन पक्षांच्या सरकारसोबत वाटचाल करायची आहे, असा टोला देखील कृपाशंकर सिंह यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘चला दापोली…’; किरीट सोमय्यांच्या ट्विटने अनिल परबांचं टेंशन वाढलं

मोठी बातमी! नवाब मलिकांच्या लेकीच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

“तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत”

Netflix वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कंपनीने घेतला मोठा निर्णय

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More