बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॅडमिंटनपटू कृष्णा नागरला सुवर्णपदक; भारताचं स्पर्धेतील 19 वं पदक

टोकियो | आपल्या देशाचा खेळातील प्रदर्शनाचा आलेख आता उंचावत चालला आहे. देशात सध्या टोकियोच्या यशाचा जल्लोष चालू आहे. देशाने 4 सुवर्णपदकासह एकूण 18 पदकं पटकावली. या पदकांमध्ये अजून एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे. देशाला बॅडमिंटन या प्रकारात 5 व सुवर्ण पदक मिळालं आहे. या पदकासह देशाची एकूण पदक संख्या 19 झाली आहे.

भारतीय बॅडमिंटन खेळाडू कृष्णा नागरने ऐतिहासीक कामगिरी केली आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याला नमवून कृष्णाने देशाला सुवर्ण पदक पटकावून दिलं आहे. बॅडमिंटन या प्रकारात हाॅंगकाॅंगच्या खेळाडूला पराभूत करत कृष्णाने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे. कृष्णाच्या या यशाने देशाचं राष्ट्रगीत आज टोकियोत वाजत आहे.

अवघ्या वयाच्या दोन वर्षाचा असताना कृष्णाच्या पालकांना समजलं की कृष्णा इतर मुलांप्रमाणे नाही. त्यावेळी पासून सुरू झालेला संघर्षमय प्रवास आज सुवर्ण पदकापर्यंत येऊन पोहोचला आहे. कृष्णाने बॅडमिंटनच्या एसएच 6 या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहेे. कृष्णाने अंतीम सामना 21-17,16-21, 21-17 अशी कामगिरी करत जिंकला आहे.

एसएच6 हा प्रकार शरीराची वाढ कमी असलेल्या खेळाडुंसाठी असतो. कृष्णाच्या शरीराची वाढ ही इतरांप्रमाणे नव्हती. म्हणून त्याने खचून न जाता. खेळावर लक्ष केंद्रीत केलं. घरापासून 13 किमी पेक्षा जास्त अंतरावर जाऊन तो सराव करत असत. त्याच्या परिश्रमाचं आज चिज झालं. कृष्णा नागरने आज देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.

थोडक्यात बातम्या 

महत्त्वाची बातमी! कोरोना लस घेऊनही आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांची दमदार कामगिरी; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पटकावलं रौप्यपदक

‘पवारसाहेब देशाचे नेते, त्यांनी भारताचं नेतृत्व करावं’; संजय राऊतांचा पुनरुच्चार

“भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली, पाप केलं की कोरोना होतोच”

राज्यात आज कुठे कुठे पाऊस होणार?, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More