Top News पुणे महाराष्ट्र

‘कृष्णकुंजवर न्याय मिळतो’; मावळवासियांकडून राज ठाकरेंचे आभार

Photo Courtesy- Twitter/ MNS Adhikrut

मुंबई | टोल प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी आक्रमक असते. अनधिकृत टोल प्रकरणात मनसेने मोठं आंदोलन केलं होतं. इतरही प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी संतप्त नागरिक राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर भेटी देत असतात. मनसेचे कार्यकर्ते मनसे स्टाईलने आंदोलन करत प्रकरण मार्गी लावतात. कृष्णकुंजवर न्याय मिळतो अशी आशा नागरिकांमध्ये आहे. वर्सोली आणि सोमाटने-तळेगाव दाभाडे टोलनाक्यावर टोलमुक्ती करावी म्हणून मावळवासियांनी राज ठाकरेंकडे धाव घेतली होती.

पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी 18 फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे गेले होते. स्थानिक नागरिकांचा सोमाटने-तळेगाव दाभाडे टोलनाक्यावरच्या टोलवसुलीला विरोध आहे. तो टोल बंद करण्यात यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून राज ठाकरे यांच्याकडे केली गेली होती.

गेल्या भेटीत राज ठाकरेंनी सरळ आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांना फोन लावला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा तात्काळ परिणाम मिळतो तसाच राज’दरबारी मिळतो. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया शिष्टमंडळाने दिली आहे. त्यामुळे आता MH14 पासिंग असलेल्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही.

दरम्यान, लोणावळ्यातील वर्सोली आणि सोमाटने-तळेगाव दाभाडे टोलनाक्यावर मावळ तालुक्यातील गाड्यांना टोलमाफी देण्यात आली. सर्वपक्षीय टोल हटावो कृती समितीने ही माहिती दिली आहे. याचा फायदा मावळ तालुक्यातील रहिवाशांना होणार आहे. अखेर मावळवासियांना न्याय मिळाला असून नियमांचे उल्लंघन करून टोल आकारला जात होता. राज ठाकरेंनी ही चुक लक्षात आणून दिल्यावर हा टोल बंद करण्यात आला, असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून ‘या’ वकिलानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाहा व्हिडीओ

आज हिंदू समाज थकलाय, ज्या दिवशी तो जागा होईल त्यावेळी…- मोहन भागवत

राजेश टोपेंची जनतेला कळकळीची विनंती; म्हणाले…

‘भारतासाठी खेळायचं त्याचं स्वप्न आता पूर्ण होईल’; इशानच्या आईवडिलांना अश्रु अनावर

कॅनरा बॅंकेचं स्तुत्य पाऊल, हाऊसिंग तसेच एज्युकेशनल लोनला गती देण्यासाठी उपक्रम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या