मुंबई | बाॅलिवूडमध्ये कोणाचं अफेअर चालू असणं, हे काही आता नवीन नाही. पण सध्या बाॅलिवूडची(Bollywood) अभिनेत्री क्रिती सेनन(Kriti Sanon) आणि दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास(Prabhas) यांच्या अफेअरच्या चर्चा जरा जास्तच पुढं गेल्या आहेत. सध्या असं म्हणलं जात आहे की, प्रभासनं क्रितीला प्रपोज केलं आहे.
सोशल मीडियावरही या चर्चांणा उधाण आलं आहे. काहीजण तर त्यांना कमेंट करत थेट लग्नाबद्दल विचारत असतात. पण क्रिती आणि प्रभास खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का ?, हे कोणालाच माहित नव्हतं. त्या दोघांनीही यावर बोलणं टाळलं होतं. पण नुकतंच क्रितीनं यावर मौन सोडलं आहे.
नुकतीच क्रितीनं इंस्टाग्रामवर याबाबत एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत तिनं प्रभास सोबतच्या नात्यावर खुलासा केला आहे. तिनं स्टोरीमध्ये लिहिलं आहे, हे प्रमोशन पण नाही आणि प्रेम पण नाही. आमचा भेडीया रिअॅलिटी शोमध्ये जरा जास्तच बोलला, असा टोला तिनं नाव न घेता वरून धवनला(Varun Dhawan) लगावला.
पुढं तिनं असंही लिहिलं आहे की, काही माध्यमांनी माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्याआधी, मी हे स्पष्ट करते की या सगळ्या अफवा आहेत. या बेसलेस अफवांवर विश्वास ठेऊ नये.
क्रिती आणि वरूननं काही दिवसांपूर्वी ‘झलक दिखला जा’ च्या शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना वरून म्हणाला होता की, क्रीतीचं प्रेम त्या व्यक्तीवर आहे, जो सध्या मुंबईत नाही आणि त्याचं शूटिंग दीपिका सोबत सुरू आहे. वरूनच्या या वक्तव्यानंतर तर प्रभास-क्रितीच्या नात्याबद्दलच्या चर्चेला उत आला होता.
दरम्यान, क्रिती आणि प्रभासचा ‘आदिपुरूष’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास रामाच्या आणि क्रिती जानकीच्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.