बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लॉकडाउन त्वरीत उठवा’; अभिनेत्याची सरकारकडे मागणी

मुंबई | लॉकडाउनमुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. उद्योगधंदे बंद झाले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी तर जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीत त्वरीत लॉकडाउन उठवावा अशी मागणी अभिनेता कमाल खानने सरकारकडे केली आहे.

जर लहान मुलं आणि काही लोकं अन्नाशिवाय रस्त्यावर मरत असतील तर खरोखर हे अमानुष कृत्य आहे. लॉकडाउन त्वरीत समाप्त करायला हवा. तरच एक कोटी लोक आपल्या घरी परतू शकतील. तुम्ही या लोकांना काही मोजक्या ट्रेन सोडून घरी पाठवू शकत नाही, असं कमाल खानने म्हटलं आहे.

कमाल खान आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही काळात तो लॉकडाउनच्या निमित्ताने सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहे.

दरम्यान, कृपया माझ्या विनंतीचा स्विकार करा, अशा आशयाचं ट्विट कमाल खानने केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार, कामगारांना पायी जाण्यापासून रोखा- देवेंद्र फडणवीस

80 वर्षीय वडिलांना खांद्यावर घेऊन मजुराचा मुलुंड ते वाशिम 350 किमी पायी प्रवास

महत्वाच्या बातम्या-

अमित शहांच्या तब्येतीविषयी अफवा पसरवणाऱ्या चौघांना गुजरातमध्ये अटक

मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज- आयुक्त शेखर गायकवाड

दिग्गजांना बाजूला सारत विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ युवा नेत्याला संधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More