“सारखा सारखा कोरोना आणि आता अॅक्सिडेंट हे सगळं…”

मंबई | राष्ट्रवादीचे (Ncp) नेते आणि आमदार धनंजय मुंडे (Mla Dhananjay Munde) यांचा अपघात झाला आहे. परळीतील आझाद चौकात त्यांचा अपघात झाला . यामध्ये धनंजय मुंडे यांनी मला किरकोळ दुखापत झाल्याचं म्हटलं होतं.

मुंबईत आल्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अपघाताबद्दल माहिती दिली.

धनंजय मुंडे यांच्या अपघात झालेल्या गाडीचा व्हिडीओ समोर आला. आता यावरून धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

धनंजय मुंडे एकदम ठणठणीत आहे त्यांना एवढ्या लवकर काही होणार नाहीये. सारखा सारखा कोरोना आणि आता अपघात पिक्चर अभी बाकी है. 25 वर्षांपासून हेच बघतेय मी, असं करूणा मुंडे म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-