बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन, बाळाचं नावंही आहे अगदी खास; पाहा फोटो

मुंबई | भारतीय संघाचा क्रिकेटपटू कृणाल पांड्या याच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. कृणाल पांड्याने आपण बाबा झाल्याचं सोशल मीडियावरून सांगितलं आहे. कृणालने काल सोशल मिडियावर पोस्ट करत आपला आनंद शेअर केला. त्याने काल त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो टाकला त्यामध्ये त्याच्या पत्नीसह तो त्याच्या मुलासोबत दिसून आला. हार्देिक पांड्याप्रमाणे तोही एका मुलाचा बाबा झाला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याही(Hardik Pandya) काका झाला आहे.

कृणाल पांड्याने इंस्टाग्रामवर मुलाचा फोटो शेअर करताना मुलाचं नाव देखील जाहीर केलं आहे. त्याने मुलाचं नाव ‘कवीर कृणाल पांड्या’ असं सांगितलं आहे. हे नाव त्याच्या चाहत्यांना देखील आवडले आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

फॅन्स प्रमाणेच क्रिकेट क्षेत्रातील अनेकांनी कृणाल पांड्या व त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या. झहीर खानच्या पत्नीने त्याला व त्याच्या पत्नीला आई- बाबा झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. के.एल.राहुलने (KL Rahul) देखील दोघांना शुुभेच्छा दिल्या. तसेच मोहसीन खानने देखील ‘मुबारक भैय्या’ असं म्हणत शुभेच्छा दिल्या. कृणाल पांड्या आणि मोहसीन खान एकाच टीममध्ये काम करतात. ‘लखनौ सुपर जायंट'(lucknow Super Giants)साठी ते दोघे एकत्र काम करतात.

कृणाल पांड्या टीम इंडियापासून लांब आहे.परंतु आयपील त्याने चांगलीच गाजवली आहे. आयपीलमध्ये(IPL) त्याने चांगली कामगिरी केली आहे. आयपीलमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.’मुंबई इंडियन्य'(Mumbai Indiance)कडून खेळताना पांड्या ब्रदर्सचा चांगलाचं वट होता.

 

थोडक्यात बातम्या:

सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित

मोठी बातमी! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…

पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

असदुद्दीन ओवैसींचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More