बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव; ‘या’ खेळाडूला झाली कोरोनाची लागण, आजचा टी-20 सामना रद्द

मुंबई | श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघातील खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यामुळे आजचा दुसरा टी-20 सामना रद्द केला असून पुढे ढकलण्यात आला आहे. पांड्या बंधूंमधील अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली आहे. कृणाल एकदिवसीय सामन्यांची पूर्ण मालिका खेळला होता आणि पहिल्या टी-20 सामन्यामध्येही त्याचा समावेश होता. त्यामुळे पुर्ण संघ संकटात सापडला आहे.

कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व संघाला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली असून यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. आजचा सामना रद्द झाल्यामुळे कधी खेळवण्यात येणार असा प्रश्न सर्व क्रीडाप्रेमींना पडला आहे.

आजचा सामना उद्या खेळवण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे. मात्र त्यासाठी संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. जर सर्व खेळाडूंच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरच हा सामना उद्या खेळवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात करत विजय मिळवला होता. या सामन्यातही कृणालचा संघाता समावेश होता. तर दुसरीकडे इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील खेळाडू रिषभ पंत आता कोरोनातून बरा झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा

‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’

‘बाई पॅन्ट कुठे आहे?’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल

‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More