‘या’ अभिनेत्याने कपडे आणि शूज ठेवण्यासाठी घेतला 3BHK फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क!

krushna abhishek buys 3bhk flat to keep his clothes and shoes

Krushna Abhishek | मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा छंद असतो. काहींना महागडे कपडे घालायला आवडतात, तर काहींना महागड्या बुटांचा शौक असतो. (Krushna Abhishek )

काही कलाकारांकडे महागड्या गाड्यांचा ताफा आहे, तर काहींकडे अलिशान घड्याळांचे (Watches) संग्रह आहेत. पण एका अभिनेत्याने केवळ आपला छंद जोपासण्यासाठी एक चक्क 3BHK फ्लॅट (3 BHK Flat) विकत घेतला आहे. या घरात त्याने आपले कपडे (Clothes) आणि शूज (Shoes) ठेवले आहेत.

हा अभिनेता आहे कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek). कृष्णाने आजवर काही चित्रपटांमध्ये आणि कॉमेडी शोजमध्ये (Comedy Shows) काम केले आहे. तो एक यशस्वी विनोदी अभिनेता (Comedian) आहे. नुकतेच त्याने अर्चना पूरण सिंगच्या (Archana Puran Singh) पॉडकास्टमध्ये (Podcast) हजेरी लावली होती. यावेळी त्याने या अजब छंदाबद्दलचा खुलासा केला आहे. कृष्णाला अलिशान ब्रँडचे कपडे आणि शूज वापरण्याचा शौक आहे. गेल्या काही वर्षांपासून तो त्याचे कलेक्शन (Collection) वाढवत आहे.

कृष्णाने घराचे रूपांतर केले बुटीकमध्ये

अर्चना पूरण सिंगसोबत बोलताना कृष्णाने सांगितले की, त्याने एक 3BHK घर विकत घेतले असून त्याचे रूपांतर बुटीकमध्ये (Boutique) केले आहे. हे ऐकून परमीत सेठीला (Parmeet Sethi) धक्काच बसला. त्याने फक्त कपडे आणि शूज ठेवण्यासाठी 3BHK फ्लॅट घेतला आहे, हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. (Krushna Abhishek )

दर सहा महिन्यांनी बदलतोय फ्लॅटमधील वस्तू

कृष्णा पुढे म्हणाला की तो दर सहा महिन्यांनी या फ्लॅटमधील वस्तू बदलत असतो. यावेळी अर्चना गमतीने म्हणाली की तिचा मुलगा आयुष्मान (Ayushmaan) देखील त्याच्याच उंचीचा आहे. त्यामुळे शिफ्टिंग (Shifting) दरम्यान तो जे काही काढेल ते त्याने आयुष्मानला द्यावे.

कॉलेजच्या दिवसांत घालायचा गोविंदाचे (Govinda) कपडे

कॉलेजच्या दिवसांमध्ये कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek ) त्याचा मामा गोविंदाचे महागडे कपडे घालायचा. त्यावेळी त्याला हे माहित नव्हते की ते कपडे इतके महागडे आहेत. त्याला वाटायचे की D&G (Dolce & Gabbana) ब्रँड गोविंदा आणि डेव्हिड धवन (David Dhawan) यांचा आहे, कारण त्या दोघांनीही त्यावेळी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

Title: krushna abhishek buys 3bhk flat to keep his clothes and shoes

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .