मुंबई | रेणू शर्मा यांनी हेगडे यांचा आदर करत असल्याचं सांगितलंय. त्याबाबत हेगडे यांना विचारले असता, त्या माझ्या आदर करतात. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण आदर दुरूनच करा. मीही त्यांचे लांबूनच आभार मानतो, असं भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी म्हटलंय.
मी धनंजय मुंडेंना ओळखतो. त्यांना 2012मध्ये एकदाच भेटलो होतो. पण ते माझे मित्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मदतीसाठी धावून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं कृष्णा हेगडे यांनी स्पष्ट केलंय.
मुंडे प्रकरण कोर्टात आहे. त्यामुळे त्यावर मला फारसं भाष्य करायचं नाही. हे केवळ एक प्रकरण नाही. तर हा पॉलिटिक्सचा पहिला मीटू प्रकार आहे, असं हेगडे म्हणालेत.
दरम्यान, रेणू शर्मा यांनी आपण कृष्णा हेगडे यांचा आदर करत असल्याचं म्हटलं होतं. कृष्णा हेगडे, मनिष धुरी हे दोघे धनंजय मुंडे यांना राजकीय मित्र म्हणून मदत करत असतील. परंतु मी कृष्णा हेगडेंचा आदर करते, ते माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतात हे मला माहीत नाही, असं रेणू शर्मा म्हणाल्या होत्या.
थोडक्यात बातम्या-
लस घेतली म्हणजे आता सर्व काही संपलं असं नाही- उद्धव ठाकरे
लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी अदर पुनावालांनी स्वत: घेतली लस; पाहा व्हिडीओ
…नाहीतर मीच पहिली लस घेतली असती- उद्धव ठाकरे
तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तर सावधान; तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात!
“कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ औवेसी”
Comments are closed.