Top News महाराष्ट्र मुंबई

मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्ही तक्रार का देताय?, हेगडे म्हणाले…

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्यावर भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात पत्र लिहून सविस्तर माहिती दिली आहे. रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्ही तक्रार का देताय?, असा प्रश्न हेगडे यांना विचारण्यात आला. यावर आज त्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलं आहे, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो, उद्या दुसरं कोणी असेल. ही आमिषाने भुलवणे, हनी ट्रॅप, ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीची कार्यपद्धत आहे, असं हेगडेंनी सांगितलं.

मी मुंबई पोलिसांना विनंती करतो, त्यांनी एफआयआर दाखल करुन तार्किक निष्कर्ष काढावा, अशी विनंती कृष्णा हेगडेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंडे प्रकरणात मोठा ट्विस्ट; रेणू शर्माविरोधात तक्रार करण्यासाठी ‘हा’ भाजप नेता पोलिस स्थानकात

“राममंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव, संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार?

धनंजय मुंडे प्रकरणावर राष्ट्रवादीचीही ‘तीच’ भूमिका-अजित पवार

शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्यानं ते परत घेणं सरकारची जबाबदारी- भुपेश बघेल

“धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय नसून ते वैयक्तिक”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या