बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांवर डॅशिंग IPS कृष्ण प्रकाश म्हणाले…

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाने लिहिण्यात आलेल्या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचं काम दिलं होतं, असा धक्कादायक आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर डॅशिंग आयपीएस अधिकारी तथा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्यांवर होणारे हे आरोप मनाला न पटणारे आहेत, असं कृष्ण प्रकाश यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

शहरात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो… तो सरकारचा समर्थक असो वा विरोधातला, त्याच्याशी पोलिसांचा संबंध नाही. कारण गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, असं कृष्ण प्रकाश यांनी म्हटलं आहे.

पिंपरी चिंचवडला भयमुक्त करणं हे आमचं टार्गेट आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यातून वसुलीसंदर्भातलं पत्र व्हायरल झालं. त्या संबंधित प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, असं कृष्ण प्रकाश म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

क्रूरतेचा कळस! सांगलीत बैलगाडा शर्यतीत बैलांना बॅटरीने शाॅक देत मोठ्या काठीने जबर मारहाण

…तर आधी स्वत: खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा- रुपाली चाकणकर

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत आहे’; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

नवनीत राणांचा अरविंद सावंतांवर लोकसभेत गंभीर आरोप, म्हणाल्या…

दिल्लीत दारू पिण्यासाठीची वयोमर्यादा घटवली; दिल्ली सरकारची नव्या उत्पादन शुल्क धोरणाची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More