“गुन्हा दडवायला सिस्टीम एकत्र येते पण..”; पोर्शे अपघातावर ‘या’ कलाकाराची संतप्त पोस्ट

Kshitij Patpardhan post on Porsche Car Accident

Porsche Car Accident | राज्यात पुणे अपघात प्रकरण चर्चेत आलं आहे. बिल्डरच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला कोर्टाने जामीनही दिला आहे. 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर मुलाला जामीन मिळालाय. यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. अगोदर आरोपी मुलाला पोलिस स्टेशनमध्येच पिझ्झा-बर्गर देण्यात आला.दोन जणांचा जीव घेणाऱ्याला रॉयल ट्रीटमेंट दिल्याने नागरिकांकडून देखील संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशात एका मराठी कलाकाराची पोस्ट चर्चेत आली आहे.

क्षितीज पटपर्धनची पोस्ट

या प्रकरणी मराठमोळा दिग्दर्शक-लेखक क्षितीज पटपर्धनने संतप्त पोस्ट लिहिली आहे. क्षितीजने त्याच्या इन्स्टाग्रावर पोस्ट लिहित संताप व्यक्त केलाय. “मुंबईत होर्डींग असो किंवा पुण्यात गाडी, या देशात गुन्हा दडवायला जेवढ्या तत्परतेने सिस्टीम एकत्र येते, तेवढी सोडवायला येत नाही हे खरं दुर्दैव आहे. आपण नाव, जागा बदलत श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या फक्त!”, असा संताप क्षितीज पटपर्धनने पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी त्याचं समर्थन केलंय.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. व्यावसायिकाच्या 17 वर्षीय मुलाने आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या मुलाचे नाव वेदांत अग्रवाल असं आहे. या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जीव गेला आहे.

या घटनेनंतर वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. यासोबतच अल्पवयीन वेदांत हा बार आणि पबमध्ये गेला होता. त्यावेळी प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, व्यवस्थापक सचिन काटकर, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वेदांतने जी कार चालवली ती विनाक्रमांकाचीच (Porsche Car Accident) होती. पोर्शे कार बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन पुणे येथे आणण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती पोर्शे कार अजूनपर्यंत रजिस्टर नव्हती.त्यामुळे पुणे पोलिसांवर देखील मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Kshitij Patpardhan

News Title – Kshitij Patpardhan post on Porsche Car Accident

महत्त्वाच्या बातम्या-

पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुलाच्या कबुलीने खळबळ!

कुख्यात गुंड गजानन मारणेनं आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर मारलं!

बारावीचा निकाल जाहीर! विद्यार्थ्यांनो पुढच्या प्रवेशासाठी काढून ठेवा ‘ही’ कागदपत्रे

राणी मुखर्जीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?; म्हणाली,”लग्नानंतर प्रेम..”

अखेर बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .