जाधव यांच्या पत्नी आणि आईला विधवेसारखी वागणूक!

नवी दिल्ली | पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईला विधवेसारखी वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत निवेदन करताना ही माहिती दिली. 

कुलभूषण यांना भेटण्यापूर्वी त्यांची पत्नी आणि आईला कपडे बदलण्यास भाग पाडण्यात आलं. त्यांचं मंगळसूत्र आणि कपाळावरची टिकली काढून घेण्यात आली. कुलभूषण यांनी आईला भेटताच बाबा कसे आहेत?, असा प्रश्न त्यामुळेच विचारला, असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.

दरम्यान, विमानाने प्रवास केला तेव्हा कुलभूषण यांच्या पत्नीच्या चपलेत कॅमेरा आढळला नाही मग पाकिस्तानात गेल्यावरच कसा कॅमेरा आढळला?, असा सवालही त्यांनी केला.