बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुलदीप यादव आणि माझ्या यशामागे धोनी”

नवी दिल्ली | कुलदीप यादव आणि माझ्या उत्तम कामगिरीमागे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे मोलाचे योगदान आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने दिली आहे. तो एका मुलाखतीत बोलत होता.

सुरवातील आम्ही दोघंही इतर फिरकी गोलंदाजाप्रमाणे फक्त धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी करायचो पण धोनीमुळे आमचा आत्मनिश्वास उंचावला, असं मत चहेलने व्यक्त केलं आहे.

आमची विकेट्स घेण्याची भूक धोनीमुळे वाढली. आम्ही प्रत्येक चेंडू विकेट्स घेण्याच्या उद्देशानेच टाकू लागलो, असंही चहेलने सांगितलं.

धोनीने मला आणि कुलदीप यादवला जोडी बनवून गोलंदाजी करण्यास प्रोत्साहीत केल्याने आम्ही आता एकमेकांना अनुकूल अशी गोलंदाजी करु शकतो, असं म्हणत चहलने सगळं श्रेय धोनीला दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-धोनीने दिलेल्या अनेक टीप्स अपयशी ठरतात; ‘या’ क्रिकेटपटूचा खुलासा

-बरं झालं पश्चिम बंगालमुळे भाजपला लोकशाही आठवली- संदिप देशपांडे

-दुष्काळी उपाययोजनांबाबत शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र

-“कोलकात्यातील हिंसाचाराला पश्चिम बंगालमधील सरकार जबाबदार”

-सीआरपीएफ नसते तर मी वाचू शकलो नसतो- अमित शहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More