Kuldeep Yadav | टीम इंडियाचा फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा टी20 विश्वचषक खेळत असताना त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत होता. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज ऐवजी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली होती. त्या संधीचं त्याने सोनं केलं. टी20 विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत इंग्लंड विरूद्ध खेळत असताना कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर आता कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.
कुलदीप यादवने विवाहाबाबत सोडलं मौन
सोशल मीडियावर कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. टी20 विश्वचषक संपताच कुलदीप यादव आता त्याच्या विवाहाला घेऊन चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. त्या अभिनेत्रीसोबत कुलदीप यादव विवाह करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता कुलदीप यादवने मौन सोडलं आहे. त्याने बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लग्न करणार नसल्याचं सांगितलं आहे.
एका मुलाखतीत बोलत असताना त्याने त्याच्या विवाहाबाबत खुलासा करत सांगितलं की, तुम्हाला लवकरच एक आनंदाची बातमी द्यायची आहे. मात्र ती बॉलिवूड अभिनेत्री नसल्याचं कुलदीप यादव म्हणाला आहे. तिने माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असं कुलदीप यादव माध्यमांसोबत मुलाखतीत बोलत होता.
टी20 विश्वचषकात कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जादूने चांगली गोलंदाजी केली. त्याने टी20 विश्वचषकातील 5 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 10 गडी बाद केले आहेत. ऑस्ट्रेलिया विरूद्ध कुलदीपने चांगला स्पेल टाकला. तसेच त्याने केवळ 14 धावा देत 2 गडी बाद केले आहेत. कुलदीप यादवने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 12 कसोटी, 103 वनडे आणि 40 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
कुलदीपने 53 कसोटी, 168 वनडे आणि टी20 सामन्यांमध्ये 69 ग़डी बाद केले आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यावर कुलदीप यादवला आराम देण्यात आला आहे. मात्र श्रीलंकेच्या दौऱ्यात तो खेळेल अशी शक्यता आहे. टीम इंडिया जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे सामने आणि तीन टी20 सामने खेळवण्यात येईल.
कुलदीप यादवने विवाहावर केला गौप्यस्फोट
दरम्यान, कुलदीप यादव कोणाशी विवाह करणार आहे. याबाबत स्वत: कुलदीप यादवने माध्यमांसोबत बोलत असताना सांगितलं आहे. कुलदीप यादव बॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत विवाह करणार नाही. तर त्याचा त्याची काळजी घेणारी आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या मुलीसोबत तो विवाह करणार असल्याचं कुलदीप म्हणाला आहे.
News Title – Kuldeep Yadav Will Marry Bollywood Actress Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
ऐकावं ते नवलंच! पीएम आवास योजनेचे पैसे मिळताच 11 महिला बॉयफ्रेंडसोबत झाल्या फरार, पती मात्र..
सावधान! पुढील तीन दिवस ‘या’ भागात दमदार पाऊस पडण्याची शक्यता
मोठी बातमी! ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव, रूग्णांची संख्या आली समोर
इंडियन बँकेत होतेय तब्बल 1500 पदांसाठी भरती; ‘इथे’ करा अर्ज
‘अशा’ लोकांपासून चार हात दूरच राहा नाहीतर भिकेला लागाल!