Kulhad Pizza Couple | सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड प्रसिद्ध झालेले जालंधरचे (Jalandhar) ‘कुल्हड पिझ्झा कपल’ (Kulhad Pizza Couple) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी चर्चेचे कारण त्यांचा कोणताही व्हायरल व्हिडिओ (Viral Video) किंवा त्यांचा प्रसिद्ध पिझ्झा (Pizza) नसून, या जोडप्याने भारत सोडल्याची बातमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहज अरोरा (Sehaj Arora) आणि गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) हे जोडपे आपल्या मुलासह युनायटेड किंग्डमला (UK) स्थलांतरित झाले आहे. सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
अनोख्या कल्पनेतून प्रसिद्धी
सहज आणि गुरप्रीत यांना ‘कुल्हड पिझ्झा कपल’ म्हणून ओळखले जाते. सहज अरोराने जालंधरमध्ये कुल्हडमध्ये पिझ्झा बनवण्याची अनोखी कल्पना सुरू केली आणि हे जोडपे प्रकाशझोतात आले. भगवान वाल्मिकी चौक (Bhagwan Valmiki Chowk) ते बी.आर. आंबेडकर चौक (B.R. Ambedkar Chowk) (नाकोदर चौक – Nakodar Chowk) या मार्गावर त्यांचे दुकान होते. सुरुवातीला छोट्या काउंटरवरून कामाला सुरुवात करणाऱ्या सहजचे गुरप्रीतशी लग्न झाल्यानंतर त्याचे नशीब पालटले. त्याचा व्यवसाय झपाट्याने वाढला आणि तो सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाला. (Kulhad Pizza Couple)
वाद आणि प्रसिद्धीचा दुहेरी फटका
या जोडप्याची लोकप्रियता जितक्या वेगाने वाढली, तितक्याच वेगाने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. एअर रायफलसोबतचा (Air Rifle) फोटो शेअर केल्याने त्यांच्यावर जालंधर पोलिसांनी (Jalandhar Police) गन कल्चरला (Gun Culture) प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांच्या रेस्टॉरंटमधील (Restaurant) एका माजी कर्मचाऱ्याने त्यांचे काही वैयक्तिक आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. सुरुवातीला या जोडप्याने हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले, परंतु नंतर जेव्हा आणखी व्हिडिओ समोर आले तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तनिशा (Tanisha) नावाच्या तरुणीला अटक केली.
निहंगांचा विरोध आणि धमक्या
अलीकडेच निहंग शिखांनी (Nihang Sikh) त्यांच्या रेस्टॉरंटबाहेर निदर्शने करत सहजकडून पगडी परत करण्याची मागणी केली होती. त्यांनी सांगितले की, या जोडप्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओंचा मुलांवर वाईट परिणाम होत आहे. सहजने सोशल मीडियावरून व्हिडिओ हटवला नाही तर त्याच्यावर कठोर कारवाई करू, अशी धमकी निहंगांनी दिली होती. यानंतर हे जोडपे उच्च न्यायालयात (High Court) गेले. (Kulhad Pizza Couple)
आता सततच्या धमक्यांना कंटाळून ‘कुल्हड पिझ्झा कपल’ने भारत सोडून यूकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते आपल्या मुलासोबत यूकेमध्ये नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करतील. यापूर्वी या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवाही पसरल्या होत्या. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते.
Title : Kulhad Pizza Couple Leaves India