Top News खेळ

2011 वर्ल्ड कप फायनल फिक्सिंग प्रकरणी संगकाराची तब्बल 8 तास चौकशी, पाहा काय आहे प्रकरण…

दिल्ली | 2011 सालचा वर्ल्ड कप आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आहे. या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. मात्र आता या विजयाच्या 9 वर्षानंतर श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंदा अलुथगामगे यांनी ही मॅच फिक्स असल्याचा आरोप केला. याचप्रकरणी त्यावेळचा श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराची नुकतीच तब्बल 8 तासांपैक्षा जास्त चौकशी करण्यात आली आहे.

2011 च्या वर्ल्ड कप फायनलच्यावेळी अलुथगामगे श्रीलंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यामुळे श्रीलंकेच्या सरकारने या आरोपांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. याच चौकशीचा भाग म्हणून कुमार संगकाराची क्रीडा मंत्रालयाच्या स्पेशल इनव्हेस्टिगेशन युनिटने 8 तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी केली. त्याआधी श्रीलंका टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष राहिलेल्या अरविंदा डिसिल्वा यांचीही चौकशी करण्यात आली.

संगकाराच्या चौकशीदरम्यान श्रीलंकेतल्या एका युवा संघटनेचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर उपस्थित राहून निदर्शनं करत होते. एका महान क्रिकेटपटूला कारण नसताना त्रास दिला जात असल्याचा आरोप, या कार्यकर्त्यांनी केला आहे.

श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकाराची चौकशी केल्यानंतर संघातील आणखी एक महत्वाचा खेळाडू महेला जयवर्धनेचीही चौकशी करण्यात आली आहे. महिंदानंदा अलुथगामगे यांनी फिक्सिंगचे आरोप करताना कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत. तरीही श्रीलंका सरकारकडून याची चौकशी केली जातेय.

ट्रेंडिंग बातम्या-

जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, थेट सीमेवर जाऊन मोदींचं संबोधन

कोरोनाविरोधी लढ्यात पुणे महापालिकने टाकला टॉप गिअर, आता….

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अनेकांची नावं समोर आली- अनिल देशमुख

पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी…., अजितदादांनी केली ‘ही’ महत्त्वाची सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या