मुंबई | प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झालीये. कुमार सानू यांच्या टीमने फेसबुकद्वारे ही माहिती त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
त्यांच्या फेसबूकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये, दुर्दैवाने सानूदा यांच्या कोरोनाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे कृपया त्यांच्या आरोग्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, असं नमूद करण्यात आलंय.
आता नुकतंच 20 ऑक्टोबर रोजी कुमार सानू यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या हा वाढदिवस कुटुंबीयांसोबत घालवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या-
“हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे”
नितीश कुमार यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला; चिराग पासवान यांचा आरोप
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात – अशोक चव्हाण
बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही- उद्धव ठाकरे