नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पाहा कुणी केली भविष्यवाणी…

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पाहा कुणी केली भविष्यवाणी…

लातूर | नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असं सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमानिमित्त लातूरमध्ये आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. 

देशात रस्ते बनवण्यापलिकडे कुठलीही विकासकामं सुरु नाहीत. समाजातील वातावरण बिघडवलं जात आहे. एकमेकांविषयी द्वेष पसरवला जात आहे, असं सप्तर्षी म्हणाले. 

मराठा आरक्षण ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली राजकीय खेळी आहे. मराठा आरक्षण कोर्टात टिकणं अशक्य आहे, असं ते म्हणाले. 

दरम्यान, मोदी निवडून आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी एका मुस्लीम तरुणाचा बळी घेतला. तेव्हापासून मी मोदींचा कट्टर विरोधक बनलो, असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

महत्वाच्या बातम्या-

-राजस्थानच्या निकालाबद्दल रामदास आठवलेंचं भाकीत, पाहा काय म्हणाले…

-पालकमंत्री दाखवा अन् हजार रुपये मिळवा; बुलडाण्यातील अजब प्रकार

-आता मी बघतो किती लोक वाचतात; नरेंद्र मोदींचा गांधी परिवाराला इशारा

-‘लोग कहते है मैं शराबी हूं’ गाण्यावर भाजप आमदाराचा बेधुंद डान्स

-…मग अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांकडून सल्ला घ्यायला पाहिजे होता!

Google+ Linkedin