मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, पक्षातील चुकांवर गप्प बसणार नाही- विश्वास

नवी दिल्ली | मला पक्षाचं पद नको तसंच मला मुख्यमंत्रीही बनायचं नाही, मात्र पक्षातील चुकांवर मी शांत बसू शकत नाही, असं म्हणत आपचे नेते कुमार विश्वास यांनी केजरीवालांवर टीकास्त्र सोडलं.

दिल्ली पालिका निवडणुकीत आपचा दारुण पराभव झाला, त्यानंतर आपमध्ये वादाची ठिणगी पडली. आपचे आमदार अमनतुल्ला खान यांनी कुमार विश्वास भाजप आणि संघाचे एजंट असल्याचा आरोप केला होता. त्यापार्श्वभूमीवर कुमार विश्वास यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आपला लक्ष्य केलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या