बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ब्लू फिल्म्स पाहणाऱ्या RSS कडून शिकण्यासारखं काहीच नाही’; ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

बंगळुरू |  जनता दलाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी 2012मधील एका घटनेचा संदर्भ दिलाय. ते म्हणाले, भाजपच्या तीन मंत्र्यांना अधिवेशनादरम्यान पॉर्न व्हिडीओ पाहताना पकडण्यात आलं होतं. त्यावेळी भाजप सरकारसाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. या घटनेमुळं अखेर त्या तीन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

कुमारस्वामींना भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार पाटील यांनी आरएसएस शाखेला भेट देऊन तिथं होणाऱ्या गोष्टींची माहीती घेण्यासाठी निमंत्रण दिले होते. याबाबत त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रीया दिली.

आरएसएसची सोबत नको असल्याचं सांगत तिथं काय शिकवलं जातं हे आपल्याला माहीत नाही का?, असा सवालही त्यांनी केला. विधानसभेत कसं वागावं?, अधिवेशनादरम्यान ब्लू फिल्म्स पाहाव्यात का?, आरएसएसच्या शाखेत भाजपला ही गोष्ट शिकवली जात नाही का?, हे शिकवण्यासाठी मला तिथं जावं लागेल का?, असे खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

आरएसएसकडून शिकण्यासारखं काहीच नाही, शाखेकडून जे काही शिकायचं आहे ते मी गरीबांच्या शाखेकडून शिकलो आहे. असंही कुमारस्वामी म्हणाले. दरम्यान, भाजप हे आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यानुसार केंद्रात आणि कर्नाटकात काम करतंय, असा आरोप करत कुमारस्वामींनी भाजपला ‘बाहुले’ असे संबोधले होते.

थोडक्यात बातम्या

भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागून मनसेशी युती करु नये – रामदास आठवले

देशातील नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ, पाहा ताजी आकडेवारी

आधी कुत्रा माणसाला चावला मग माणूस कुत्र्याला चावला अन् नंतर…

राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू, मात्र पुणे जिल्ह्यांबाबत अजून शंकाच

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा पुन्हा भडका, या महिन्यातील आज 15वी दरवाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More