“दोन तासांत ‘सस्पेंड” करतो म्हणणाऱ्याचा माज उतरला; २४ तासांत पोलिसांसमोर टेकवले गुडघे

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar l छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात सुसाट वेगात व्हीआयपी सायरन (VIP Siren) वाजवत कारने जाणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या प्रसिद्ध बिल्डर (Builder) कुणाल बाकलीवालची (Kunal Bakliwala) श्रीमंतीची नशा पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये उतरवली आहे.

त्याचा एक व्हिडिओ काल (दि. २६ जानेवारी) सकाळच्या सुमारास व्हायरल झाला होता. हिंदीतून ‘तू मला ओळखले नाही का, बुढ्ढे तेरेको ड्युटी करनी आती क्या’ असे म्हणत शिवीगाळ करून चक्क त्याने पोलिसांनाच (Police) निलंबित (Suspend) करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली होती.

परिणामी पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या आणि धमकवणाऱ्या कुणाल बाकलीवाल याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलीवालची मस्ती उतरवत त्याला २४ तासांमध्ये गुडघ्यावर टेकवले आहे.

राज्यात सुसाट गाड्या चालवणाऱ्यांची कमी नाही. त्यात सिग्नल तोडून सायरन वाजवत अनेकजण सर्रास फिरताना दिसतात. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत ‘आपलंच राज्य’ अशा अविर्भावात वावरणारेही खूप आहेत. असाच एक प्रकार काल २६ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर शहरात बघायला मिळाला. प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलीवाल याने पोलिसांसोबत हुज्जत घालत काळ्या आलिशान गाडीतून शिवीगाळ करून चक्क पोलिसांनाच निलंबित करण्याची धमकी दिली.

पोलिसांनी जाब विचारला असता त्याने गाडीतून खाली उतरण्याचे कष्टही न घेता ‘पोलीस’ या पदाला कचरा असल्याप्रमाणे वागवत धमकावण्यापर्यंत मजल मारली. ‘तू मला ओळखले नाही का, बुढ्ढे तेरेको ड्युटी करनी आती क्या’ असे म्हणत शिवीगाळ केली होती.

व्हिडिओ व्हायरल आणि बाकलीवालवर कारवाई :

त्यानंतर पोलिसांना गाडीतून खाली उतरायलाही नकार देत त्याने, “साहेबांना बोल, मला ओळखत नाही का? दोन तासांत तुम्हाला निलंबित करतो,” अशी धमकी दिली. गाडीतूनच माजोरड्या बाकलीवालने पोलिसांना गप्प बसण्यास सांगितले होते.

याच वेळी पोलिसांनी हा सर्व प्रकार रेकॉर्ड (Record) केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला होता. मात्र, हे लक्षात येऊनही त्याचा माज कमी झाला नाही. “जनतेच्या पैशातून पगार मिळतो, पण तुम्ही जनतेलाच वागवता का?” असे सांगत त्याने एका मोठ्या व्यक्तीचा फोन पोलिसांकडे दिला होता. दरम्यान, पोलिसांनी या माजोरड्या कुणाल बाकलीवालला आता ताब्यात घेतले आहे.

News Title: kunal-bakliwala-arrogance-down-police-arrested-him-in-24-hours

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .