बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

kunal Kamra म्हणतो, “मी एक कोरोना व्हायरस आहे म्हणून…”

नवी दिल्ली | कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळं सध्या विविध गोष्टींवर बंदी घालण्यात येत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना (Public Programme) यामध्ये कसलीही सुट देण्यात येत नसल्याचं सध्या दिसत आहे. अशातच प्रसिद्ध काॅमेडियन कुणाल कामरा (Populer Comedian kunal Kamra) सध्या प्रचंड नाराज आहेत. कुणाल कामरा यांच्या शो साठी कोरोनाचा हवाला देत प्रशासनानं नकार (Reject The Permmission) दिल्याची घटना समोर आली आहे.

कुणाल कामरा आपल्या हटके अंदाजासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर तर कुणाल कामरा यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळत असते. कुणाल कामरा यांचा काॅमेडी शो बंगळुरूमध्ये होणार होता. पण या शो साठी प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. परिणामी कुणाल कामरा यांनी आपली नाराजी ट्विट करून दर्शवली आहे.

तुम्हाला मला सांगायचंय की, माझे येत्या दिवसात जेवढे काही शो होते ते रद्द करण्यात आले आहेत. कारण मी एक कोरोना व्हायरस आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कुणाल कामरा यांनी दिली आहे. माझे शो हे कोरोनाचं कारण देत नाकारण्यात येत आहेत. याबद्दल कुणाल कामरा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कुणाल कामरा यांनी आपला शो रद्द केल्याबद्दल ट्विट केलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या (Tejaswi Surya) यांना टॅग करत कुणाल कामरा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या 

“आम्हाला KL Rahul संघात हवा होता पण…”,रिलीज होताच धक्कादायक खुलासा

Omicronचा धोका वाढतोय; केंद्र सरकारचं महाराष्ट्राला तातडीचं पत्र

“एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष…”, नाना पटोलेंचं जोरदार प्रत्युत्तर

Winter: हिवाळ्यात ठणठणीत रहा; आहारात करा ‘या’ 6 पदार्थांचा समावेश

लागला की मेळ! ना काॅंग्रेस, ना भाजप…’या’ भेटीमुळे देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More