बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदीजी, मी चालू तरी शकतो का? का त्यावरही बंदी आहे?- कुणाल कामरा

नवी दिल्ली |  प्रसिद्ध स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा याच्यावर इंडिगो या विमान कंपनीने सहा महिन्यासाठी बंदी घातली आहे. या पार्श्वभूमिवर कुणालने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्याने या संदर्भात ट्विट केलं आहे.

मोदीजी, मी चालू तरी शकतो का? का त्यावरही बंदी आहे?, असा टोला कुणालने लगावला आहे. कुणाल आणि पत्रकार अर्णव गोस्वामी मुंबई-लखनौ विमान प्रवास करत होते. त्यावेळी प्रवासात कुणालने अर्णववर प्रश्नांची बरसात केली. यावर अर्णवही चांगलाच वैतागला. त्यामुळे इंडिगो या कंपनीने विमानात प्रवाशांशी गैरवर्तवणूक केल्यामुळे ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे.

सोशल मीडियावरुन कुणालवर केलेल्या कारवाईचे पडसाद उमटले आहेत. अनेकांनी कुणालला समर्थन दिलं आहे तर अनेकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान,  कुणाल कामरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील वक्तव्य आणि पोस्टसाठी प्रसिद्ध आहे. त्याने अनेक वेळा मोदींची फिरकी घेतली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“देशद्रोह्यांना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत”

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला

महत्वाच्या बातम्या-

“सीएएविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही”

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंद्रायणी थडीचं’ उद्घाटन

तुकडे-तुकडे गँगची फाईल का दाबून ठेवली?; फडणवीसांचा केजरीवालांना सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More