‘मला कशाचीही खंत नाही!’ कुणाल कामराचा पोलिसांना सडेतोड जबाब

Kunal Kamra controversy

Kunal Kamra controversy l स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना वापरलेली भाषाशैली, गाणी आणि त्यातून दिलेले संदेश आता राजकीय व सामाजिक वादाचे कारण ठरत आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कामराशी फोनवर चौकशी केली असून, त्याने सध्या आपण तामिळनाडूत असल्याचं सांगितलं आहे.

स्फोटक वक्तव्य आणि स्टँडअपमध्ये उपरोधिक गाणी :

कुणाल कामराने स्पष्टपणे सांगितलं की, “मला काही खंत नाही, कोर्ट सांगेल तेव्हाच माफी मागेन”, अशी ठाम भूमिका त्याने मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामराने माफी मागावी, अशी मागणी विधानसभेत केली होती. त्यावर कामराने कोणताही पश्चाताप नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

कामराने आपल्या स्टँडअप शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरावर उपहासात्मक शैलीत गाणं सादर केलं. ‘भोली सी सूरत, आँखो मे मस्ती’ या गाण्याच्या चालीवर केलेल्या गायनात त्याने ठाण्यातील रिक्षा, दाढी, चष्मा, गुवहाटी असे संदर्भ देत शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. “पक्ष बदलणारी व्यक्ती, माझ्या नजरेतून गद्दार,” असे वाक्य त्याच्या परफॉर्मन्समधून चर्चेत आली आहेत.

Kunal Kamra controversy l शिवसैनिक आक्रमक, स्टुडिओची तोडफोड :

या परफॉर्मन्सनंतर शिवसैनिकांनी स्टुडिओवर हल्ला चढवला असून, सेटची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. सत्ताधारी आमदारांनी कामरावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे, तर विरोधकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली आहे.

हॅबिटट स्टुडिओ, जिथे कार्यक्रम पार पडला, त्यांनी कामराच्या विधानांपासून फारकत घेतली आहे. “परफॉर्मरच्या विधानांसाठी स्टुडिओ जबाबदार नाही,” असं स्पष्ट करत त्यांनी स्टुडिओ तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. “स्वतःला आणि आमच्या मालमत्तेला धोक्यात न घालता मुक्त अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधेपर्यंत आम्ही बंद ठेवतो,” असं स्टुडिओच्या मालकांनी सांगितलं आहे.

News Title: Kunal Kamra Refuses to Apologize, Says ‘Only If Court Orders’

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .