बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीत कुरघोडी सुरुच, सरकारमधील 8 आमदार नाराज

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांमध्ये चलबिचल असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा तर केलीच, पण त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकिकडे काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे सरकारमधील घटक पक्ष नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. घटक पक्षांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानेच ते बहुमत सिद्ध करू शकले होते. मात्र, आता सरकार आम्हाला सतत डावलत आहे, असा आरोप घटक पक्षांतील 8 आमदारांनी केला आहे.

आज मुंबईमध्ये घटक पक्षांच्या आमदारांची महत्वाची बैठक पार पडली. यापुढे काय रणनीती असेल हे ठरविण्यासाठी ही बैठक महत्वाची असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या बैठकीमुळे आता महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान,  समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्यासोबतच इतर डाव्या पक्षांचे नेते देखील या बैठकीला उपस्थित होते. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये चालू असणाऱ्या या कुरघोडींचा फायदा भाजप नक्कीच करुन घेणार, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?’; फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल

चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पण मृतांच्या संख्येत घट 

“तुमचे आवडते मुख्यमंत्री पाचव्या नंबरवर आहेत हे विसरु नका”

‘इसमे गलत क्या है?’; पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला ‘या’ काँग्रेस नेत्याचा पाठिंबा

‘जबरदस्त काम करतायत मुख्यमंत्री’; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून योगींचं कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More