ब्रेक फेल की… कुर्ल्यातील अपघातामागचं खरं कारण काय?

Kurla Bus Accident

Kurla Bus Accident l मुंबईतील कुर्ला येथे ‘बेस्ट’ बसचा भीषण अपघात झाला आहे. काल रात्री या अपघातात 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की, यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताचं खरं कारण काय? :

मात्र हा भीषण अपघात कशामुळे झाला असा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात येत आहे. तसेच ज्या बसचा अपघात झाला त्याचा ड्रायव्हर हा मद्यधुंद होता की बसचे ब्रेक फेल झाले होते ? त्याबद्दल देखील अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र या धक्कादायक घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांच्या मते ड्रयव्हर हा मद्यधुंद होता.

याशिवाय झोन 5 चे डीसीपी गणेश गावडे यांच्या म्हणण्यानुसार या अपघाताचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता याप्रकरणी पोलिसांनी बस ड्रायव्हर संजय मोरे ( वय 54) याला अटक केली असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा देखील दाखल केला आहे.

Kurla Bus Accident l चालकाविरुद्ध गुन्हा दाखल :

दरम्यान, या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान देखील जखमी झाले आहेत. यामधील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून कुर्ला पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

News Title –  Kurla Bus Accident

महत्वाच्या बातम्या- 

राजकीय वर्तुळात शोक, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं निधन

“लाडक्या तायांनो, आता रस्त्यावर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून स्वतःचं रक्षण…”; किरण माने यांची पोस्ट

महायुतीत कुणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?, संभाव्य यादी समोर

मुंबई हादरली! कुर्ल्यात मृत्यूतांडव, भरधाव बेस्टने समोर दिसेल त्याला चिरडलं, नेमकं काय घडलं?

आज वृषभसह ‘या’ राशींना मिळणार शुभवार्ता, धनलाभाचेही संकेत!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .