Kurla Bus Accident | मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या ‘बेस्ट’ बसच्या अपघातामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. काल रात्री या अपघातात 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की, यात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर, 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी, पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे.चालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kurla Bus Accident )
कुर्ला अपघातस्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात आली आहे. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस मार्केटमध्ये घुसल्याची माहिती मिळत आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
332 नंबरची बेस्टची बस ही कुर्ल्याहून अंधेरीकडे जात होती. ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असताना हा अपघात झाला. कुर्ल्यात आल्यानंतर बेस्ट बसचं नियंत्रण सुटलं आणि हा भयंकर अपघात घडला, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप अपघाताचं कारण पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. (Kurla Bus Accident )
या भरधाव वेगातील बसने 30 ते 40 वाहनांना देखील धडक दिली. काही वाहने अगदी 100 मीटरपर्यंत फरफटत नेली. बस इतकी वेगात होती की तिने धडक दिलेल्या गाड्या रस्त्याच्या बाजूला बांधकाम सुरु असलेल्या पिलरवर आदळून अगदी चक्काचूर झाल्या. रात्री पाऊणे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताचे अनेक व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहेत.
“घटनेची सखोल चौकशी व्हावी”
कुर्ल्यातील कालच्या भीषण अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद ठेवण्यात आलं आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. ‘ही दुर्घटना धक्कादायक आणि चिंताजनक असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. (Kurla Bus Accident )
कुर्ला रेल्वे स्टेशन जवळील एस जी बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसनं अनेकांना चिरडल्याची अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली असून यामध्ये काही जणांचा दुर्दैवी मृत्यू व अनेक जण जखमी झाल्याची बातमी मन पिळवटून टाकणारी आहे. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.… pic.twitter.com/rautymjruM
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 9, 2024
News Title – Kurla Bus Accident
महत्वाच्या बातम्या-
आज वृषभसह ‘या’ राशींना मिळणार शुभवार्ता, धनलाभाचेही संकेत!
खळबळजनक! पुण्यात भाजप आमदाराच्या मामाचं भर चौकातून अपहरण
प्रियांका गांधींनी राजीनामा द्यावा; भाजप नेत्यानी केली मागणी
राज ठाकरेंनी सरकारकडे केली पहिली मागणी; काय आहे मागणी?
“शारीरिक दुखापत करत त्याने मला…”, ऐश्वर्या रायच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं!