बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोगोईंकडून न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याच्या तत्वांशी तडजोड”

नवी दिल्ली | न्यायव्यवस्थेतून निवृत्तीनंतर पद घेणं म्हणजे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला कमकुवत करण्यासारखं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी व्यक्त केलं आहे. जोसेफ यांनी रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर जोरदार टीका केली आहे.

गोगोई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यांच्या तत्वांशी तडजोड केली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीची ऑफर गोगोई यांच्याकडून स्वीकारण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या न्यायपालिकेवरील विश्वासाला धक्का बसला आहे, असं जोसेफ यांनी म्हटलं आहे.

न्यायव्यवस्था भारतीय संविधानाचा मुळ आधार असून गोगोई यांच्या निर्णयाने आपण आश्चर्यचकित झाल्याचं कुरियन यांनी सांगितलं.

दरम्यान, कुरियन यांच्याव्यतिरिक्त दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.पी. शाह आणि उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आर.एस. सोढी यांनी देखील गोगोई यांच्या राज्यसभा स्वीकारण्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘हा’ तर निव्वळ बेजबाबदारपणा’; कोरोनाग्रस्त रुग्णावर रितेश संतापला

‘येस बँक’ निर्बंधमुक्त; 50 हजारांवरील रक्कम काढण्यास मुभा

महत्वाच्या बातम्या-

बंडखोर आमदारांना भेटायला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक

रस्त्यावर थुंकल्यास आता भरावा लागणार तब्बल इतका दंड!

कोरोनाचा धोका ऑगस्ट महिन्यापर्यंत; डोनाल्ड ट्रम्प यांचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More