TMKOC | सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. बऱ्याच कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. त्यांच्या जागी आता नवीन कलाकार आले आहेत. अशात प्रेक्षकांसाठी एक वाईट (TMKOC) बातमी समोर आली आहे.
गोली ने सोडला ‘तारक मेहता’ शो
मालिकेत ‘गोली’ची भूमिका साकारणाऱ्या कुश शाहने आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तून निरोप घेतला आहे. आतापर्यंत दिशा वकानी (Disha Vakani), शैलेष लोढा, जेनिफर मिस्त्री, गुरुचरण सिंगसह काही कलाकारांनी हा शो सोडला. त्यानंतर आता कुश शाहने देखील ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वतः कुशनेच हा शो सोडल्याची माहिती एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे. “जेव्हा हा शो सुरू झाला, तेव्हा तुम्ही आणि मी पहिल्यांदा भेटलो होतो, मी खूप लहान होतो. तेव्हापासून तुम्ही मला खूप प्रेम दिले. तुम्ही मला जेवढे प्रेम दिले आहे तेवढेच प्रेम या कुटुंबाने मला दिले आहे. माझ्या इथे खूप आठवणी आहेत. इथे काम करताना खूप मजा आली. मी माझे बालपण इथे घालवले आहे. मी तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला, माझे पात्र खूप मनोरंजक बनवले आणि मला नेहमीच प्रेरित केले. त्यांच्या विश्वासामुळेच कुश ‘गोली’ बनू शकला.”, असं गोली व्हिडिओमध्ये (TMKOC) म्हणाला आहे.
अभिनेता कुश शाह याने सोडली मालिका
“मी या शोला निरोप देतोय मात्र तुमचे प्रेम कायम आठवणीत राहील. पण हो, फक्त मी, कुश शाह या शोचा निरोप घेत आहे. तुमचा गोली तसाच राहील. तोच आनंद, तेच हास्य व तीच मस्ती. या शोमध्ये अभिनेता बदलू शकतो, पण पात्र नाही,” असंही कुश म्हणाला आहे.
यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कुश आता मालिकेत दिसणार नाहीये. कुशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने मालिकेच्या संपूर्ण टीमसह केक कापून सेलिब्रेशन केले. त्याने(TMKOC) असित कुमार मोदी यांनाही केक भरवला. त्यावेळी असित यांनी कुशचे भरभरून कौतुक केले.
News Title – Kush shah aka goli quits TMKOC show
महत्त्वाच्या बातम्या-
‘भावी मुख्यमंत्री’, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरात झळकले बॅनर
“गुजरातमधून तडीपार केलेला माणूस..”; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर
अजितदादांना झटका! बड्या नेत्याची शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी
आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार!
नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती