‘ख्वाडा’कारांचा आणखी एक ग्रामीण बाज, पाहा ‘बबन’ची पहिली झलक

अहमदनगर | जमीन विकून ‘ख्वाडा’ सिनेमाची निर्मिती करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवणाऱ्या भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘बबन’ नावाचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या सिनेमाची पहिली झलक यूट्यूबवर दाखवण्यात आली आहे.

‘ख्वाडा’ प्रमाणेच ‘बबन’ देखील ग्रामीण बाज असलेला सिनेमा असणार आहे. सिनेमाच्या पहिल्या झलकवरुन तरी हेच दिसतंय. 

दरम्यान, ख्वाडानं राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यामुळे प्रेक्षकांच्या भाऊराव कऱ्हाडेंकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

पाहा बबनची झलक-