मुंबई | नववर्षाचं स्वागत सगळीकडे मोठ्या उत्साहात सुरू आहे. सामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटूंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
नमस्कार उद्धवजी तुम्हाला, रश्मी वहिनीना, आदित्य, तेजस आणि तुमच्या सर्व सहकार्यांना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. तुम्ही महाराष्ट्राच्या भल्याचा नेहमीच विचार करता, असं म्हणत लता मंगेशकर यांनी उद्धव ठाकरेंना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आई जगदंबा ,श्री शिवछत्रपती महाराज आणि बाळासाहेब यांची कृपा आणि मार्गदर्शन आपल्याला सदैव मिळत राहील आणि आपल्या हातून महाराष्ट्राचा विकास होईल याची मला खात्री असल्याचंही लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. लता दीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सदर प्रणाम नरेंद्रभाई, तुम्ही देशासाठी जे काम करत आहात ते प्रशांसनीय आहे मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुमच्या आईला माझा नमस्कार, असं लता दीदींनी म्हटलं आहे.
@OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/T7mc0fJT0d
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 1, 2021
थोडक्यात बातम्या-
सोनमची कपूरची बातच न्यारी! हटके अंदाजात दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
#Video | धारावीत घरात शिरलेल्या अजगराला पोलिसानं स्वत:च्या हातानं धरुन बाहेर काढलं
“मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं काय झालं?”
‘एकच वादा अजितदादा’ vs ‘पुण्याची ताकद गिरीष बापट’, भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
‘काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?’; बाळासाहेब थोरात म्हणाले…