बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संचारबंदीमुळे परप्रांतीय मजूर परतीच्या वाटेवर; बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 15 दिवस कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर परप्रांतीय मजुरांनी आपापल्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे बस स्थानक व रेल्वे स्टेशनवर मजुरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मुंबईतील लोकमान्य टिळक कुर्ला टर्मिनस, कल्याण रेल्वे स्टेशन तसेच पुण्यातील पुणे रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर परप्रांतीय मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुंबईतील कुर्ला टर्मिनस रेल्वे स्टेशनवर काँग्रेस पक्षातर्फे स्टॉल लावून नागरिकांना पाण्याचं वाटप करण्यात येत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

ज्या नागरिकांकडे रेल्वेचं आरक्षित तिकीट नाही, अशा नागरिकांसाठी विशेष रेल्वे सोडता येईल का त्यासंदर्भात आपण चर्चा करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तसेच ज्या लोकांकडे तिकीट आहे ते लोक रांगेमध्ये रेल्वेस्थानकावर प्रवेश करत आहेत. पण संचारबंदीमुळे आपापल्या गावी परतणाऱ्या मजुरांमुळे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दीचं चित्र पाहायला मिळालं.

महाराष्ट्राचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कालच परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्र सोडू नका, असं आवाहन केलं होतं. महाविकास आघाडी सरकारतर्फे मजुरांची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि त्यांची जबाबदारी घेतली जाईल असंही यावेळी हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी घोषित केल्यानंतर भितीपोटी मजुरांनी परतीची वाट पकडली असल्याने स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या –

जाणुन घ्या पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी

संचारबंदीकाळात महाराष्ट्रात दारू मिळणार की नाही?

महत्वाची बातमी! संचारबंदीकाळात वाहतुकीसाठीचे निर्बंध काय? वाचा एका क्लिकवर…

निर्बंध असतानाही कटिंगचं दुकान सुरू; पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू

‘राज्य सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतंय’; पुण्याच्या महापौरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More