मुंबई | परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसंच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाने काढला आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने कारणाने मजूर वर्गाचे हाल होत आहे. तसंच त्यांच्या पोटा-पाण्याचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या गावाची वाट धरली आहे. परंतू गाड्या सुरू नसल्याने ते पायी प्रवास करत होते. मात्र शासनाने दखल घेत त्यांच्यासाठी आता विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा हजारो कष्टकरी मजूर प्रवाशांना फायदा मिळणार आहे. आता त्यांच्याकडून तिकीटाचे पैसे न घेता हे मुख्यमंत्री सहायता निधीतून शुल्क भरले जाईल,
ट्रेंडिंग बातम्या-
उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित; रायगडची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल
उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत
महत्वाच्या बातम्या-
निवृत्तीबद्दल रोहित शर्माने केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…
अर्थमंत्र्यांनी बोलावली सरकारी बँक अधिकाऱ्यांची बैठक; उद्या मोठी घोषणा होण्याची शक्यता
दिलासादायक! पुणे विभागातील ‘इतके’ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले
Comments are closed.