Sleep Issues l निरोगी शरीरासाठी शांत आणि पुरेशी झोप आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र, अनेकजण इच्छा असूनही झोप घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना निद्रानाशाचा त्रास होतो. यामागे चुकीची जीवनशैली आणि असंतुलित आहार हे महत्त्वाचे घटक असू शकतात.
झोपेवर व्हिटॅमिन्सचा मोठा प्रभाव :
तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या समस्यांवर आहाराचा थेट प्रभाव पडतो. योग्य प्रमाणात व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. वरिष्ठ आहारतज्ज्ञ यांनी झोपेच्या समस्यांसाठी आवश्यक असलेल्या दोन महत्त्वाच्या व्हिटॅमिन्सबाबत माहिती दिली आहे.
व्हिटॅमिन डी प्रामुख्याने हाडांच्या आरोग्यासाठी ओळखले जाते, मात्र त्याचा संबंध झोपेच्या चक्राशीही असतो. हे शरीरातील सर्केडियन सायकल (Circadian Cycle) नियंत्रित करण्यास मदत करते. जर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल, तर झोपेचा कालावधी कमी होतो आणि झोप लवकर तुटते.
Sleep Issues l व्हिटॅमिन डीची कमतरता भरून कशी काढावी? :
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे. जसे सूर्यप्रकाश आपल्या जैविक घड्याळावर परिणाम करतो, तसेच व्हिटॅमिन डीही शरीराची झोपेची प्रक्रिया सुधारण्यात मदत करते.
दरम्यान, व्हिटॅमिन बी 6 शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करणारे महत्त्वाचे घटक आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सेरोटोनिन (Serotonin) आणि मेलाटोनिन (Melatonin) या झोपेसाठी जबाबदार असलेल्या हार्मोन्सच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे झोप अनियमित होते आणि काही वेळा नैराश्यही जाणवू शकते.
या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे निद्रानाश आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे गाजर, केळी, दूध, अंडी, चीज, पालक आणि संपूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. हे पदार्थ नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन बी 6 प्रदान करतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारतात.