Ladaki Baheen Yojana | राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळाली होती.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. मात्र, काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे अजूनही जमा झाले नाहीत.
अर्ज केलाय पण पैसे आले नाही तर…
माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलेच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. महिला शक्ती दूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रारी नोंदवू शकतात. तसेच महिलांना याबाबत अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार नोंदवता येईल. पैसे जमा झाले नाही त्यांनी नेमकं काय करावं यासंदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत.
Ladaki Baheen Yojana | ‘या’ गोष्टींची तपासणी करा
- तुम्ही लाडकी बहीण अॅप किंवा नारीशक्ती पोर्टलवरुन अर्ज केला आहे. तो मंजूर झाला आहे. परंतु पैसे बँक खात्यात आले नाही. तर आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक आहे की नाही? हे तपासून पाहा.
- बँक खाते आधारकार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा. त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील.
- तुमच्या मोबाइलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे. त्यानंतर त्या त्रुटीची पुर्तता करुन अर्ज पुन्हा सबमिट करावा.
- आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहावे.
- बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये. कोणत्याही बँकेते ५०० किंवा हजार रुपयांसोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येते.
महत्त्वाच्या बातम्या-
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी!
पुण्यात राबवली लाडके दाजी योजना, हॉटेलच्या बिलावर मिळतेय 1500 रु. सूट
गुजरात टायटन्सच्या हेड कोचची धुरा ‘हा’ खेळाडू सांभाळणार; जाणून घ्या त्यामागची 3 मोठी कारणे
सुप्रियाताईंना देखील लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळणार?
‘अशा’ व्यक्तींनी चुकूनही सफरचंद खाऊ नये; अन्यथा होतील गंभीर परिणाम