Ladaki Bahin Scheme | राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार असून हे पैसे येत्या बुधवारपर्यंत (12 मार्च) त्यांच्या बँक खात्यात जमा होतील, अशी माहिती महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली. (Ladaki Bahin Scheme)
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकत्रित अनुदान
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्रित आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थीला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे प्रत्येकी 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.
महिला आणि बालविकास विभागाने या निधीचे वितरण शुक्रवारी सुरू केले असून ही प्रक्रिया 12 मार्चपर्यंत पूर्ण होईल. या कालावधीत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महिला लाभार्थींना आश्वासन
राज्यातील सर्व पात्र लाभार्थींना वेळेत निधी मिळेल याची खात्री सरकारने दिली आहे. “सर्व लाभार्थ्यांनी निश्चिंत रहावे, कारण त्यांना दोन्ही महिन्यांचा संपूर्ण लाभ मिळणार आहे,” असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. (Ladaki Bahin Scheme )
Title : Ladaki Bahin Scheme Receive Funds by March 12