Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमतेसाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘लाडकी बहीण योजना‘. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा निश्चित रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट
विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने या योजनेत बदल करण्याची घोषणा केली आहे. आता या योजनेअंतर्गत महिलांना आधीपेक्षा अधिक रक्कम दिली जाणार आहे.
या नवीन बदलामुळे महिलांना आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यास अधिक मदत होईल. आता लाडक्या बहिणींनी (Ladki Bahin Yojana) 2100 रूपये मिळणार आहेत. पण हे पैसे कधी मिळणार याची माहिती समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana | 2100 रुपये मिळणार कधी मिळणार?
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील 2. 34 कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील आणि डिसेंबर महिन्यांपासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होणे अपेक्षित आहे.
लाभार्थी महिलांना या योजनेचा पुढील हप्ता कधी मिळेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. सरकारकडून याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सावधान! हिवाळ्यात पसरतोय ‘हा’ धोकादायक आजार?
मुख्यमंत्री पदावरून नुसता गोंधळ, राष्ट्रवादीच्या नेत्याने शिंदे गटाची झोपच उडवली
राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी