बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा 10 हजार, ‘लाडका भाऊ योजने’साठी ‘असा’ करा अर्ज

Ladka Bhau Yojana | आज (17 जुलै) मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडक्या भावांसाठी मोठी घोषणा केली.

‘लाडकी बहीण योजने’नंतर राज्यात लाडक्या भावांनाही लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांनी भावांसाठीही योजनेची (Ladka Bhau Yojana) घोषणा केली. यामध्ये 12 वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत.

हे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अॅप्रेटिशीप करतील, तिथे त्यांना कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकऱ्या मिळतील. एक प्रकारे आपण कुशल कामगार तयार करत आहोत. यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, यासाठी कोण पात्र असणार, कोणाला याचा फायदा मिळणार याची माहिती समोर आली आहे. या लेखात योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘या’ वयोगटातील तरुणांना मिळणार फायदा

दरम्यान, लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत (Ladka Bhau Yojana) प्रशिक्षणादरम्यान युवकांना दरमहा 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान वय असणे आवश्यक आहे.

‘असा’ करा अर्ज

सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
नवीन वापरकर्ता (New User Registration) नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला एक (Ladka Bhau Yojana)अर्ज दिसेल.
त्या अर्जात तुमचे नाव, पत्ता आणि वयोगट भरा.
तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा.
यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

News Title – Ladka Bhau Yojana Application Filling Steps

महत्त्वाच्या बातम्या-

“थोडी तरी लाज असेल तर नरेंद्र मोदींनी..”; काश्मीरमधील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत संतापले

‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

अशा महिलांपासून राहा लांब, नाहीतर व्हाल बर्बाद

प्रशिक्षक होताच गौतम गंभीरची विराट आणि रोहितला तंबी, म्हणाला…

IAS पूजा खेडकर यांची 3 तास पोलीस चौकशी, धक्कादायक माहिती समोर