Ladka Bhau Yojna | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना 1500 रूपये देण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजनेसाठी (Ladka Bhau Yojna) बेरोजगार असणाऱ्या युवकांना महिना 10 हजार रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार याची माहिती समोर आली.
योजनेच्या माध्यमातून विद्यार्थांना 10 हजार रूपये देण्यात येणार
राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री लाडका भाऊ (Ladka Bhau Yojna) योजनेंतर्गत बारावी पास झालेल्या तरूणांना 6 हजार रूपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रूपये आणि पदवीधर विद्यार्थांना 10 हजार रूपये देण्यात येणार आहे. ‘लाडका भाऊ’ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे.
विद्यार्थ्यांना तसेच प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान महिना आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल. ‘लाडका भाऊ’ योजनेचा (Ladka Bhau Yojna) लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असणे गरजेची आहे.
लाडका भाऊ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरूण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदार व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड
निवास प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
वय प्रमाणपत्र
चालक परवाना
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
बँक खाते पासबुक
ई-मेल आयडी
अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्याअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. बहीणींसाठी योजना मग लाडक्या भावासाठी काय? असा सवाल विरोधकांनी त्यावेळी उपस्थित केला होता. त्यानंतर राज्यस रकारने लाडक्या भावांसाठी योजना आखली आहे.
News Title – Ladka Bhau Yojna Maharashtra Govt Scheme
महत्त्वाच्या बातम्या
“सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या..”; आषाढी एकादशीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
“शरद पवारांपुढं शकुनी मामाही फेल, मराठा समाजाला त्यांनी खूप फसवलं”
बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा 10 हजार, ‘लाडका भाऊ योजने’साठी ‘असा’ करा अर्ज
अजितदादा गटातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक शरद पवार गटात जाणार; यादी आली समोर
“थोडी तरी लाज असेल तर नरेंद्र मोदींनी..”; काश्मीरमधील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत संतापले