Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी १,५०० रुपये मिळून ३,००० रुपये एकत्र मिळणार असल्याची घोषणा केली आहे. ७ मार्चपर्यंत ही रक्कम सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होईल, असे त्यांनी सांगितले. (Ladki Bahin Yojana)
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी भेट
महिला दिनाच्या निमित्ताने सरकारने हा निर्णय घेतला असून, योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी एकत्र मिळणार आहे. याबाबत आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून माहिती दिली.
यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता २४ तारखेदरम्यान मिळाला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही कारणांमुळे लांबला होता. आता सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मार्चचा हप्ता लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत.
किती महिलांना मिळणार लाभ?
- डिसेंबर २०२४ मध्ये २ कोटी ४६ लाख महिलांना १,५०० रुपये मिळाले होते.
- जानेवारी महिन्यात लाभार्थींची संख्या ५ लाखांनी घटून २ कोटी ४१ लाख झाली.
- फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्याही कमी होण्याची शक्यता आहे, कारण लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी सुरू आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे नियम
- महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांसह कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिलेलाही लाभ मिळेल.
- २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलाच या योजनेसाठी पात्र असतील.
- बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. (Ladki Bahin Yojana)
Title : Ladki Bahin Yojana 3000 to Be Credited in March 7