Ladki Bahin Yojana l महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवली आहे. या योजनेला प्रतिसाद देखील चांगला मिळाला आहे. अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना जुलै महिन्यापासून प्रतिमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Ladki Bahin Yojana l फडणवीस नेमकं काय म्हणाले? :
सध्या नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की, आम्ही जी आश्वासनं दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. तसेच याबद्दल कुणीही मनात शंका ठेऊ नये. याशिवाय लाडकी बहीण योजना कायम सुरूच राहणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
याशिवाय आमची एकही योजना बंद होणार नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. याशिवाय आता यापुढेही लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. तसेच विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता काय? :
-21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
-ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
-ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
-कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी तत्त्वावर नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
-ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
-संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही.
-ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक कर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
News Title – Ladki Bahin Yojana 6th Installment
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ मंत्र्याच्या मुलावर हल्ल्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
सासऱ्याने जावयावर केला अॅसिड हल्ला! कारण ठरलं हनीमूनचं…
… तर मग नव्या मंत्र्यांनी काय करायचं?; शिंदे गटाच्या आमदाराचा संतप्त सवाल
अमित शाहांच्या वक्तव्याने वाद, आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन
“वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये…”; आमदार क्षीरसागर कडाडले